ए तो व्हिडिओ लाव रे... सत्ताधार्‍यांची पुराव्यानिशी पोलखोल; राज ठाकरेंच्या भाषणांचा भाजपने घेतला धसका

Foto

 देशभरात सध्या सर्वत्र राजकीय पक्षाची आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रणधुमाळी सुरू आहे. पण एकही उमेदवार उभा नसताना निवडणूक काळात लाखोंच्या सभा घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपच्या मंडळीची झोप उडविली आहे. ठाकरे पुराव्यानिशी पंतप्रधानांना टार्गेट करीत असल्याने तसेच त्यांच्या ‘ए तो व्हिडिओ लावरे’ या आदेशाने पुढे काय दाखवणार याचा धसका सत्ताधार्‍यांनी घेतला आहे.

देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीत विविध पक्ष संघटनांचे नेतेमंडळी आपला उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी रॅली, सभा, कार्नर बैठका, पदयात्रा काढून प्रचार करीत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना- भाजप- रिपाइं यांची महायुती आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, शेतकरी संघटनेची महाआघाडी झालेली आहे. युती आणि आघाडीत सरळ लढत होत असतानाच वंचित बहुजन आघाडी रणमैदानात उतरल्याने  सर्वत्र तिरंगी लढत होणार आहे. राज्याच्या राजकारणात प्रमुख भूमिका बजावणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी मात्र लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मनसेचा रिंगणात सध्या एकही उमेदवार नाही, असे असतानाही मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या राज्यातील प्रमुख शहरात होत असलेल्या लाखोंच्या सभा व त्यात होणारे राज ठाकरे यांची भाषणे राज्यभरात गाजत आहेत. 2014 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. पण देशात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या आश्‍वासनाचा व विकासाचा विसर पडला. मोदी यांनी देशातील जनतेला निवडणुकीपूर्वी जी स्वप्ने दाखविली. त्याचा विसर पडल्याने तसेच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची जी हुकूमशाही सुरू आहे. त्याविरुद्ध दंड थोपटले. राज ठाकरे यांनी आतापर्यंत नांदेड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर येथे झालेल्या सभांमध्ये  केंद्र सरकार, राज्य सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत जोरदार प्रहार केले. पण यावेळेसच्या सत्तामध्ये केंद्र आणि राज्य सरकार ज्या विविध योजना आम्ही राबविल्या. त्याचा जनतेला लाभ झाला असे सांगते. अशा काही फसलेल्या योजनांचा सचित्र पुराव्यानिधी व्हिडिओ सभामध्ये दाखवत आहे. ठाकरे यांच्या या नव्या पावित्र्याने भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते मात्र ठाकरे यांनी केलेल्या सचित्र पुराव्यामुळे राज ठाकरे हे काँग्रेस आघाडीचे हस्तक असल्याचा आरोप करीत आहेत. ठाकरे यांच्या ‘ए तो व्हिडिओ लावरे’चा चांगलाच धसका भाजपने घेतला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker